हृदयस्पर्शी प्रेम कथा

 marathi love letter Marathi prem patra

प्रेमपत्र मराठी {प्रेयसी रडेल वाचून} Marathi love letter Marathi prem patra   Marathi love letter, Marathi prem patra, हृदयस्पर्शी प्रेम–पत्र मराठी, प्रेम पत्र कसे लिहावे, लव्ह लेटर मराठी, प्रेम पत्र शायरी, विरह प्रेम पत्र मराठी, प्रेम पत्र दाखवा, लव लेटर कसे लिहायचे, Love letter marathi girlfriend, प्रेम पत्र फोटो.


Marathi love letter Marathi prem patra

“रात्री जेव्हा मी पाहिल आकाशात,

तेव्हा प्रत्येक ताऱ्यात फक्त तुझाच चेहरा दिसत होता,

मग जेव्हा मी मिटून घेतले डोळे तेव्हा माझ्या मनातही चेहरा तुझाच दिसत होता.” 


प्रिय प्राणसखे,


जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझा कधी झालो हे मला कळालंच नाही. तुझे ते नाजूक काळेभोर केस, आकाशातील ताऱ्यांप्रमाणे लखलखणारे डोळे, तुझे ते बोलके ओठ हे सर्व  माझ्या मनाला अक्षरशः वेड लावून गेले आहेत, पण प्रिये तुला खरं सांगायचं तर.. मी तुझा चेहरा, तुझं सौंदर्य पाहून तुझ्या प्रेमात पडलो नाही. तर मी तुझं मन, तुझा स्वभाव पाहून तुझ्या प्रेमात पडलो आहे.माझे तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. अगदी जीवापलीकडे मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जरा जरी नजरेआड झाली तरी मन माझं कासाविस होतं. कधी तुला एकदा पाहतो असं होऊन जातं. मी तुझ्याशिवाय एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. आयुष्यातला प्रत्येक क्षण युगासारखा वाटतो तुझ्याशिवाय मला.


तुझा चेहरा सतत डोळ्यासमोर फिरत असतो. सारखी तुझी आठवण येते. तू जर माझी झाली नाहीस तर माझं काय होईल या भीतीने मन अगदी घाबरून जातं. खरच प्रिये तु जर माझी झाली तर मी तुला खूप सुखी ठेवीन. अगदी फुलपाखरासारखं तुला जपेन. तुझ्यावर आजपर्यंत एवढा कोणी जीव लावला नसेल एवढा जीव मी तुझ्यावर लावीन, तुझी खूप काळजी घेईन.


एवढं सगळं खरं आहे पण तू माझी होशील काय ग? माझ्या उदास आयुष्यात सुखाची लहरी घेऊन येशील काय ग? माझ्या या भरकटलेल्या आयुष्याचा किनारा होशील काय ग तू? खरच प्रिये माझं आयुष्य तुझ्याविना समुद्रामध्ये अडकलेल्या नावेसारख आहे. ते किनाऱ्यावर पोहोचण्याची वाट पाहत आहे.


एक आशा आहे वादळवाऱ्यातून  किनारा दिसण्याची त्या नावेला. त्याचप्रमाणे मी सुद्धा त्याच आशेवर जगतोय की तू मला आधार देशील. तू माझी होशील. तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न पाहिले आहे मी. तुझ्यासोबत संसार करायचा ठरवला आहे मी. आयुष्याच्या सुख-दुःखात साथ द्यायची असं ठरवलं आहे मी.


तुझ्यासोबत जीवनातले प्रत्येक आनंदाचे दुःखाचे क्षण व्यतीत करायचे आहेत मला. मला तुझ्यासोबत डोंगरदऱ्यांमध्ये रानामध्ये फेरफटका मारायचा आहे. मला तुझ्यासोबत बागेमध्ये बागडायच आहे. तुला माझ्या मनातलं सर्व काही बोलून दाखवायच आहे. खूप काही सांगायचं आहे तुला.


तुझ्या सोबत जगण्याची कोणती स्वप्ने पाहिली आहेत मी हे तुला मला बोलून दाखवायच आहे ग! गावी असताना मी रानातील एका मोठ्या झाडाच्या फांदीवर मी तुझं नाव कोरल आहे. मला वाटत अजून तसंच असेल ते. अजून नाहीस झालं नसेल ते नाव कारण तू अजून माझी झाली नाहीस म्हणून! मला तुला ते दाखवायच आहे.


ज्यावेळी रानामध्ये पाऊस पडायचा तेव्हा मला खूप आनंद व्हायचा कारण पाऊस पडला की मी मातीमध्ये मोठ्या अक्षरात तुझं नाव कोरत असे. डोंगराच्या पायथ्यावरती असलेल्या भल्यामोठ्या दगडावर मी छोट्याशा दगडाच्या साह्याने मोठ्या अक्षरात मी तुझं नाव सुद्धा कोरल आहे. कदाचित ते पुसल गेल नसेल अजून,


Marathi love letter Marathi prem patra

Marathi love letter, Marathi prem patra, हृदयस्पर्शी प्रेमपत्र मराठी

आपल्या प्रेमाच्या अशा अनेक खुणा मी काढून ठेवल्या आहेत त्या सर्व तुझ्यासोबत घेऊन तुला सोबत घेऊन दाखवायच्या आहेत मला. त्यासाठी तुला माझ्यासोबत याव लागेल. आणि हो तुला माझ्या बद्दल कोणी काही वाईट सांगितलं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. कारण त्यांना आपले प्रेम अजिबात पाहवत नाही.


आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देईन तुला हे वचन मी तुला देतो. अगदी तुला साध्या शब्दाने सुद्धा दुखवणार नाही याची हमी देतो मी तुला. तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला माझ्या प्रेतावरुन जावं लागेल. अगं वेडे हा एक जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मात मी फक्त तुझीच वाट पाहीन.


तू जिथे असशील तिथे मी तुझ्यासाठी धावून येईल. सात समुद्राच्या पलीकडे जरी तू असली तरी मी तुझ्यासाठी सात समुद्र पार करून येईल. या जगात तुझ्यासारखी फक्त तूच एक आहे आणि संपूर्ण जग जरी कोणी माझ्या नावावर केले तर मी फक्त तुलाच निवडेन. या जगातील प्रत्येक मौल्यवान  वस्तू माझ्यासाठी तुझ्यापुढे अगदी शून्य आहे.


तू माझ्यासाठी सोन्याहून प्रिय आहेस. असं वाटतं प्रत्येक क्षणासाठी माझ्या सोबत फक्त तूच असावी. तू नेहमी समोर असावी आणि फक्त तुलाच पाहत रहावं. हे वेळ तशीच जागेवरती थांबावी आणि एकटक  तुला पाहतच रहावं असं वाटतं. खरंच प्रिये मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय राहू शकत नाही.


फक्त तुलाच मी माझ्या आयुष्याचा जोडीदार बनण्याचं ठरवलं आहे. आता माझं मन सुद्धा मला सांगत आहे की ती फक्त तुझीच आहे. एवढा पण वाईट नाही ग मी! माझे चार मित्र तुला थोडीसे वाईट वाटत असतील पण तसे नाहीत ते बिचारे! खूप चांगले आहेत माझे मित्र. माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या आई बाबांची काळजी घेतात ते.  


मी घरामध्ये नसलो की माझ्या आई बाबांची सर्व कामे ऐकतात ते. माझं प्रेम आंधळ नाही ग, अगदी वास्तविकतेचा विचार करून तुला मी हे माझ्या मनातलं प्रेम लिहीत आहे. मला वाटतं तू या गोष्टीवर विचार करावा आणि हो माझा बाबतीत कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नको तू.


तुला जर माझ्या बाबतीत काही वाटत असेल तर विचारून घे मला काही उत्तर देण्याअगोदर. आणि ह्या गोष्टीचे भान आहे मला, नुसत प्रेमाने पोट भरत नाही, या गोष्टीची सुद्धा मी व्यवस्था केली आहे. आयुष्यामध्ये मला खूप मोठ व्हायच आहे पण जगण्यासाठी प्रेम सुद्धा तितकच महत्त्वाच आहे. मला तुला गमवायचं नाही कारण माझी खरी संपत्ती फक्त तूच आहेस.


फक्त तुझाच……


Marathi love letter Marathi prem patra

हृदयस्पर्शी प्रेमपत्र मराठी

if you like “Marathi love letter, Marathi prem patra, हृदयस्पर्शी प्रेम–पत्र मराठी मराठी,” please share with your friends on social media.


Categorieslove letter

TagsLove letter marathi girlfriend, प्रेम पत्र कसे लिहावे, प्रेम पत्र दाखवा, 

Website

Anniversary Wishes in Hindi

Anniversary Wishes in Marathi

Bhai shayari

Birthday Wishes in Bengali

Birthday Wishes in Gujarati

Birthday Wishes in Hindi

Birthday Wishes in Kannada

Birthday wishes in Marathi

Chunavi Shayari

Condolence Message

Congratulations Message

Dosti Shayari

Images

love letter

Love Shayari

Marathi Status

Quotes

Rishta Shayari

Sangharsh Shayari

Shayari

Slogans

Suvichar

thank you for birthday wishes

Ukhane

Uncategorized

Wishes


Comments